इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

सत्कार नाकारले; महापुरुषांना करणार वंदन

 संवैधानिक पदावरील निवडीनंतर पंकजाताई मुंडे प्रथमच 29 रोजी बीड जिल्ह्यात: सत्कार नाकारले; महापुरुषांना करणार वंदन


परळी वैजनाथ,प्रतिनिधी....
        भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे 29 जुलै रोजी बीड जिल्ह्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडी तसेच राज्याच्या वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून त्यांची झालेली निवड या अर्थाने संवैधानिक पद घेतल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यात कोणतेही हार तुरे अथवा सत्कार त्या स्वीकारणार नसून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्या महापुरुषांना वंदन करणार आहेत.
       महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य म्हणून पंकजाताई मुंडे यांची निवड झाली. गेल्या अनेक वर्षांपासून त्या कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हत्या. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात निवड झाल्यानंतर प्रथमच त्या आपल्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या बीड जिल्ह्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यात हार-तुरे नको, सत्कार नको, माझ्या स्वागताचा बडेजाव करू नका असे त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे दि. 29 जुलै रोजीच्या बीड जिल्हा दौऱ्यात पंकजाताई मुंडे विविध ठिकाणी महापुरुषांना माल्यार्पण व वंदन करणार आहेत.

• असा आहे आ. पंकजाताई  मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा
---------------------
     सोमवार 29 जूलै सकाळी 10 वा. संत भगवानबाबांची जन्मभूमी श्री. क्षेत्र भगवान भक्तीगड, सावरगाव घाट, बीड,दुपारी 12 वा.श्रीक्षेत्र नारायणगड येथे दर्शन दुपारी 2 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बीड येथे वंदन ,सायंकाळी 4 वा.गोपीनाथ गड दर्शन,सायंकाळी 5 वा.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्टेशन परिसर, परळी वैजनाथ येथे वंदन.
    दरम्यान या दौऱ्यात पंकजाताई मुंडे या कुठलेही स्वागत स्वीकारणार नाहीत. तसेच कुठल्याही प्रकारचे हारतुरे, फुले, पुष्पगुच्छ स्वीकारणार नाहीत अशी माहिती संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!