23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रदुषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल: जनहित याचिकेवरुन महाजनको व प्रदुषण मंडळाला बजावली नोटीस

 परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रदुषणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल: जनहित याचिकेवरुन महाजनको व प्रदुषण मंडळाला बजावली नोटीस


परळी वैजनाथ: बीड जिल्ह्यातील परळी औष्णिक वीज प्रकल्पामुळे होत असलेल्या गंभीर प्रदूषणाविरोधात वडगाव दादहरी ग्रामपंचायतीच्या सरपंचाने दाखल केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावणी करताना या रिटचा जनहितार्थ निर्णय घेतला आहे. याचिकेचे जनहितार्थ रुपांतर करत  13 ऑगस्ट पर्यंत बाजू मांडण्याविषयी महाजनको व प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटिस जारी केल्या आहेत.

          न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांचा समावेश असलेल्या हायकोर्टाच्या खंडपीठाने परळी वैजनाथ औष्णिक प्रकल्पातून वर्षानुवर्षे निघणाऱ्या फ्लाय ॲश तसेच स्लरीमुळे आजूबाजूच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणावर नापीक जमिनीत रूपांतर होत असल्याची गंभीर दखल घेतली आहे. पशुधन तसेच मानवी जीवनावर थेट परिणाम होत असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकार, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजनको), आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांना नोटीस बजावली.
          परळी तालुक्यातील वडगाव दादहरी येथील सरपंच अश्विनी कुक्कर यांनी वकील प्रशांत बर्डे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट दाखल करून औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या फ्लाय ॲश आणि स्लरीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
      कुकर यांनी असा दावा केला की, कोळसा हे संयंत्र चालवण्यासाठी वापरले जाणारे प्राथमिक इंधन असल्याने, त्याचे अवशेष सुमारे 3 चौ.कि.मी.च्या परिसरात खुलेआम रचले जातात, ज्यामुळे अनेक किलोमीटरच्या परिघात पर्यावरणीय समस्या निर्माण होतात.

       ॲड.बर्डे यांनी सांगितले की, महाजनको आणि थर्मल प्लांट व्यवस्थापन पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याचा ग्रामपंचायतीचा मुख्य युक्तिवाद आहे. प्रदूषणामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आजूबाजूचा परिसर आणि शेतीवरही गंभीर परिणाम झाला आहे, जमिनी आधीच नापीक झाल्या आहेत.माणसं आणि पशुधन सारखेच समस्यांना तोंड देत आहेत. फ्लाय ॲशच्या सततच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. वीज गरजेची आहेच पण प्रदूषणावर नियंत्रण मिळवणेही गरजेचे आहे. दुर्दैवाने, प्लांट चालवणाऱ्या महाजेनकोने हे केले नाही असे ॲड. बर्डे म्हणाले.
         याचिकेत असेही निदर्शनास आणले आहे की, ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींमुळे, प्रदुषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) या समस्येची दखल घेतली परंतु आजपर्यंत कोणतेही प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक उपाय सुरू करण्यात आलेले नाहीत.
  याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत नोटीस जारी केल्या आहेत. हायकोर्टाच्या विभागीय खंडपीठाने नोटीस जारी करताना, विशेषत: राज्य सरकार, एमपीसीबी आणि महाजेनको यांना या समस्येचे निराकरण करण्यासाठी उचललेल्या पावलांवर विशिष्ट उत्तरे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
       सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे सरकारी वकील अमरजीत गिरासे, एमपीसीबीतर्फे उत्तम बोंदर आणि महाजेनकोतर्फे राहुल तांबे यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?