भावपूर्ण श्रद्धांजली:देवानंद जोगदंड यांना मातृशोक
देवानंद जोगदंड यांना मातृशोक
अंबाजोगाई, प्रतिनिधी...
बोधीघाट अंबाजोगाई येथील रहिवाशी व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग परळी वै. येथे कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर शासकीय सेवेत कार्यरत असलेले आयु. देवानंद श्रीरंग जोगदंड यांच्या मातोश्री बौद्धउपासिका, ज्येष्ठ नागरिक सुलोचना श्रीरंग जोगदंड यांचे दिनांक 20 जुलै 2024 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्या नेहमी सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर राहत असत. त्यांनी बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याची एकूण 37 पुस्तके व ग्रंथाचे वाचन केले असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही जाणीव त्यांच्यामध्ये सतत तेवत असायची. त्यांचा सामाजिक कार्याबद्दल विविध ठिकाणी त्यांचे सत्कारही करण्यात आलेले होते. त्यांच्या या अकस्मिक निधनाने सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या परिवारात एक मुलगा ,मुलगी, सून व नातवंड असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा