प्रा. लक्ष्मण हाके यांचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आवाहन
ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी भूमिका स्पष्ट करावी
प्रा. लक्ष्मण हाके यांचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आवाहन
गेवराई : ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढा उभारलाय. आता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी अन प्रमुखांनी या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले आहे. गेवराई मध्ये आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते ओबीसी बांधवांसमोर बोलत होते.
प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी जनसंवाद दौऱ्यास सुरुवात केली असून त्यांचे बीड जिल्ह्यात ओबीसी बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गेवराई येथे जनसंवाद मेळाव्यात त्यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे हे जाणीवपूर्वक ओबीसींच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. त्यांना निवडणूक पराभूत निवडणुकीत पराभूत करण्यासाठी बैठका देखील त्यांनी घेतल्या आहेत. जरांगे पाटील यांची लढाई ही गरजवंतांसाठी नसून केवळ वर्चस्ववादासाठी असल्याचे देखील आरोप हाके यांनी केला. ओबीसींनी आता आपल्या पायातील गुलामीचे जोखड झुगारून दिले पाहिजे तरच तुमचा आवाज विधानसभा, लोकसभेत पोहोचू शकणार आहे. गेवराई विधानसभेच्या इतिहासात एकही ओबीसी लोकप्रतिनिधी निवडून आलेला नाही, हे का होते याचा विचार करायला हवा.केवळ निवडणुका आल्या की तुमची आठवण या पुढार्यांना होते परंतु इतर वेळी मात्र तुम्हाला डावले जाते हा प्रकार तुम्ही ओळखा आणि स्वतःच्या हक्कासाठी एकत्र या. आज तुमचे आमचे आरक्षण वाचवण्यासाठी एकही राजकीय पुढारी भूमिका स्पष्ट करत नाही हे खरे दुर्दैव आहे. त्यांना तुमच्या मताची किंमत कळू द्या आणि जे आपल्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवा असे देखील हाके यांनी यावेळी म्हटले. तर नवनाथ वाघमारे यांनी सरकारचा आणि आमचा कोणताही संबंध नाही केवळ ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याने आम्ही हा लढा उभारला असून मुख्यमंत्री हे जातीवादी असल्याचा आरोप देखील वाघमारे यांनी केला. यावेळी प्राध्यापक पी. टी. चव्हाण यांच्यासह विविध पक्षाचे ओबीसी नेते उपस्थित होते. तसेच ओबीसी बाणव देखील मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे कायम ओबीसीच्या प्रश्नावर लढा देत आले असे प्राध्यापक हाके यांनी म्हटले. ज्यावेळी ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर संसदेला घेराव करण्यासाठी सर्व प्रमुख नेते एकत्र आले होते त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी भाजपमध्ये असताना देखील या आंदोलनात भाग घेत ओबीसींचा आवाज बुलंद केला अशाच नेत्याची आता आपल्याला गरज असल्याचे देखील हाके यांनी म्हटले आहे. तसा लढा सध्या छगन भुजबळ हे लढत अजून त्यांना यामुळेच टार्गेट केले जात असल्याचे देखील हाक यांनी म्हटले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा