मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परळी विधानसभा शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीक अण्णा कराड
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना :परळी विधानसभा शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने प्रत्येक विधानसभानिहाय शासकीय समिती गठीत करण्यात आली आहे. परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघ शासकीय समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय समिती गठीत केली आहे. या अनुषंगाने परळी विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र असलेल्या सनियंत्रण समिती अध्यक्षपदी वाल्मीकअण्णा कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व सनियंत्रण करण्यासाठी ही समिती काम करणार आहे. वाल्मीकअण्णा कराड यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्त समिती काम करणार आहे. या समितीचे तहसीलदार सदस्य सचिव असणार आहेत.
या समितीत न.प. मुख्याधिकारी, पं.स. गटविकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, महिला व बालविकास अधिकारी पर्यवेक्षिका महिला व बालकल्याण विभाग, तालुका संरक्षण अधिकारी, दोन अशासकीय सदस्य यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.या योजनेची विधानसभा क्षेत्रनिहाय देखरेख व संनियत्रण करणे,योजनेच्या अंमलबाजणीबाबत नियमित आढावा घेणे, कालबध्द पध्दतीने पात्र लाभार्थीची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे., या समितीने जिल्हयात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे आदी कामकाज या समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे. या नियुक्तीबद्दल वाल्मिकअण्णा कराड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा