इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

वैद्यनाथास अभिषेक,महाप्रसाद वाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस : परळी शिवसेनेकडून उत्साहात विविध उपक्रम 

वैद्यनाथास अभिषेक, महाप्रसाद वाटप,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

        महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.  शिवसेनेचे नेते तथा मराठवाडा संपर्क नेता आमदार सुनील प्रभू यांच्या आदेशावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, शिवसेना मराठवाडा समन्वय विश्वनाथ नेरुळकर, बीड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख परशुराम जाधव, लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुनील धांडे सर, बीड जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंभोरे , बीड  जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायणराव सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, शहर प्रमुख राजेश विभुते यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.                बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ पंचम ज्योतिर्लिंग रुद्राभिषेक करून महाआरती करण्यात आली. प्रभू वैजनाथ मंदिरासमोरील गरजूंना पावसापासून बचावासाठी घोंगटी देण्यात आली.   महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भगवान बाबा प्राथमिक विद्यालय येथे गरजवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी भगवान बाबा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दहिफळे सर यांनी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय  साहित्य देऊन शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या म्हणीप्रमाणे उपक्रम राबवून येथील शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम राबविल्याबद्दल आभार व्यक्त केले.

        यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायणराव  सातपुते शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल शिवसेना शहरप्रमुख राजेश विभुते शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश उर्फ पप्पू केंद्रे शिवसेना विधानसभा समन्वय भरत इंगळे शिवसेना विधानसभा संघटक सतीश जगताप शिवसेना तालुका सचिव प्रकाश साळुंखे शिवसेना युवासेना तालुका समन्वयक सचिन लोढा शिवसेना विभाग प्रमुख विशाल सुगरे शिवसेना शाखाप्रमुख विजय जाधव राहुल उपाडे शिवाजी दराडे हरीश पालीवाल बालाजी नागरगोजे विष्णू जाधव सुरेश जाधव आंनत मुंडे सर बडू आघाव सर सचिन आबांड सर सुनील चव्हाण दत्ता तिडके गोविंद मुंडे सर कुलकर्णी मॅडम वाघमारे मॅडम सोनवणे मॅडमअसंख्य शिवसैनिक व आजी-माजी पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....