विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीकडून लढणार
जागा काँग्रेसच्या वाट्याला: परळी विधानसभा निवडणूक लढविणार - राजेसाहेब देशमुख
श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ ळनगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सर्वधर्मीय, सर्वसामान्य माणसाला सुख, समाधान, आनंदी व भयमुक्त वातावरणात जगता यावे, तसेच परळी शहर व मतदारसंघात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण निवडणूक लढविणार आहोत अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी मंगळवार दिनांक २३ जुले रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केली.आपण निवडणूक लढवावी अशी परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वधर्मिय ,मतदारांची आणि सर्वसामान्य माणसाची प्रामाणिक इच्छा आहे. त्यांच्या भावनेचा आदर करून तसेच परळीचा सर्वांगिण विकास, श्रीक्षेत्र प्रभु वैद्यनाथ यांच्या नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहोत. याबाबत मी व माझ्या सहकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय नेत्या खासदार सौ. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेशजी चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांना भेटून आपणांस उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. तसेच परळी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला तिकीट मागणार असून याबाबत आपण महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार , माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे , प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, खा. संजयजी राऊत यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडी तर्फे अधिकृत उमेदवारी मागणार आहोत. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा