इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

परळी इंडिया व घटक पक्षाच्या वतिने उपविभागीय कार्यालयावर विशाळगड हिंसाचार प्रकरणी जोरदार निदर्शने

 परळी इंडिया व घटक पक्षाच्या वतिने उपविभागीय कार्यालयावर विशाळगड हिंसाचार प्रकरणी जोरदार निदर्शने


 जातीयतेत द्वेष निर्माण करणा-या समाज कंटकांना त्वरित अटक करुन कडक शासन करा


परळी प्रतिनिधी विशाळगड/गजापूर (कोल्हापूर) येथील हिंसाचार घडवुन धर्मांत द्वेष पसरविणा-या समाज कंटकावर त्वरित कार्यवाही करण्यात येऊन त्वरित अटक करुन कडक शासन करा या मागणीसाठी परळी इंडिया घटक पक्षाच्या वतिने परळी उपविभागीय कार्यालयावर जोरदार निदर्शने व शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

परळी उपविभागीय कार्यालयावर परळी इंडिया घटक पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने व शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगळ, गाजापुर येथील अतिक्रमनाच्या मुद्द्यावरून धार्मिक द्वेष पसरून दंगली घडवून हिंसाचार करण्यात आला आहे या घटनेत प्रशासन व पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी या धार्मिक हिंसाचार घटनेचा इंडिया घटक पक्षा तर्फे निषेध करण्यात आला.तसेच घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक शासश करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिल मुंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हानिफ उर्फ बहादुरभाई,परळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचे शहर अध्यक्ष अँड जीवनराव देशमुख, काँ.अँड.परमेश्वर गित्ते, शहर उपाध्यक्ष सुभाष देशमुख, इतेशाम खतीब,राष्ट्रवादी गटाचे फेरोजभाई, जमील अध्यक्ष,काँग्रेस प्रवक्ते बद्दर भाई, अनुसूचित जाती जमातीचे परळी शहर अध्यक्ष दीपक शिरसाट,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सद्दाम भाई,सैय्यद वाजेब, इनामदार, सय्यद अमजद अदी इंडिया आघाडी व घटक पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या