पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे केले चंद्रशेखर बावनकुळे व कुटुंबियांचे सांत्वन नागपूर ।दिनांक ०४।  भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज नागपूर येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांचे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.    बावनकुळे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे   सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते, आज दुपारी त्यांनी नागपूरला जाऊन बावनकुळे यांची व त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी प्रभावती बावनकुळे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

Photos.....विहंगम दृष्य :संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी...

 ● विहंगम दृष्य: शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा काल परळीत दाखल झाला.आज शक्तीकुंज वसाहत येथून परळी वैजनाथ येथे मार्गक्रमण करतांना परळीतील डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर असतांना टिपलेले हे विहंगम दृष्य.

 (छायाचित्रे: सुनील फुलारी, प्रेस फोटोग्राफर परळी वैजनाथ.)



संतश्रेष्ठ गजानन  महाराजांच्या पालखीचे वैद्यनाथनगरीत जोरदार स्वागत पण नगरप्रदक्षिणेची परंपरा यावर्षीही खंडीत !

दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; हरिनामाच्या गजराने परळी दुमदुमली


परळी वैजनाथ /एमबी न्यूज वृत्तसेवा
       भाविकांचे श्रध्दास्थान असलेले संत श्रेष्ठ गजनान महाराज यांच्या पालखीचे प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत आज (दि.1) आगमन झाले आहे. आज सकाळी हा पालखी सोहळा  औष्णीक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहतीतून परळी शहराच्या दिशेने रवाना झाला. श्रींच्या पालखीचे परळीच्या भाविकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. 

    आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभु वैद्यनाथाच्या नगरीतून छोट्या-मोठ्या पालख्यांचे आगमन परळी शहरात होत आहे. या पालख्यांचेही स्वागत परळीचे भाविक मनोभावे करत असल्याचे दिसत आहे.संत गजानन महाराज  पालखी काल  औ.वि.केंद्राच्या शक्तीकुंज वसाहत येथे  मुक्कामी थांबली होती. ही  पालखी  आज सकाळी 8 च्या सुमारास परळीच्या मुख्यरस्त्यावरून मार्गस्थ झाली. या पालखीचे नागरीकांनी उत्साहात स्वागत केले व दर्शन घेतले. वारकर्‍यांना ठिकठिकाणी अल्पोअपहाराची सोय करण्यात आली होती. कांही जनांनी फराळ, चहापाणी, भोजनाची व्यवस्थाही केली होती. हरी मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा ,पुण्याची गणना कोण करी, गण-गण गणात बोते,  ज्ञानोबा- तुकारामांच्या जयघोषाने वातावरण मंत्रुन गेले होते.  पंढरपुरकडे  निघालेल्या  संतश्रेष्ठ श्री  गजानन  महाराज  यांचा  पालखी  सोहळा  संत  जगमित्र मंदीरात आज मुक्कामी थांबणार आहे.दि.2 रोजी सकाळी 6 च्या सुमारास ही पालखी अंबाजोगाईकडे प्रस्थान करणार आहे. 

दोन दिवस दर्शनासाठी रीघ.....
          गजानन महाराज यांच्या पालखीचे काल दि.30 रोजी सायंकाळी परळी शहरालगत शक्तीकुंज वसाहत येथे मुक्कामासाठी आगमन झाले.राममंदिर येथे रात्री व आज सकाळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील वडगाव दा. वसाहत ते शक्तीकुंज वसाहत या मार्गावर ठिकठिकाणी भाविक दर्शनासाठी दुतर्फा थांबले होते.



६३च्यावर दिंड्याचे  परळीतून मार्गक्रमण

       दरम्यान परळी मार्गे सुमारे ६३ च्यावर दिंड्यांचा वारीचा मार्ग आहे. प्रत्येकवर्षी दिंड्यांच्या संख्येत वाढ होत असते. प्रत्येक दिंडीच्या निवासाचे स्थळ अगोदरच निश्चितअसते. तसेच मुक्कामाच्या पंगतींचेही मानकरी पूर्वनियोजित असतात.तरीही काही दिंड्यांचे हे नियोजन लागलेले नसते.

वैद्यनाथनगरी नगरप्रदक्षिणा परंपरा यावर्षीही खंडित......

        दरवर्षी आषाढी वारीसाठी विदर्भ , मराठवाडा भागातील अनेक दिंड्या परळी मार्गे मार्गस्थ होतात.पंढरपूरच्या वारी मार्गा वरील बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ प्रभूच्या वास्तव्याने पुनीत झालेले परळी हे हरी-हर ऐक्य क्षेत्र असल्याने वारकरी बंधावात याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्याचबरोबर संत जगमित्रनागा महाराजांचीही येथेच समाधी असून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे परळीत येणाऱ्या दिंड्या नगरप्रदक्षिणा करूनच मार्गस्थ होतात. अन्यत्र वारीमार्गावर कोणत्याच ठिकाणी नगरप्रदक्षिणा केली जात नाही.परळी व त्यानंतर पंढरपूर याठिकाणी दिंड्या नगरप्रदक्षिणा करतात. परंतु गेल्या वर्षीपासून संत गजानन महाराज पालखीची वैद्यनाथनगरी नगरप्रदक्षिणा परंपरा खंडित झाली आहे.याबाबत संस्थानकडे गेल्या वर्षीपासून पाठपुरावा सुरु आहे.मात्र यावर्षीही ही परंपरा खंडित झाली आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?