परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
श्रावण पर्व:11 ऑगस्ट रोजी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त ज्योतिर्लिंग वैद्यनाथास जलार्पण करण्यासाठी 11 ऑगस्ट रोजी कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कावडयात्रेत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभू वैद्यनाथास जलाभिषेक करण्यासाठी व श्रावण महिन्याच्या पर्वकाळात गंगेच्या पाण्याचे जलार्पण करण्यासाठी दरवर्षी कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही वैद्यनाथ भक्तिमंडळाच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी खडका ते परळी वैजनाथ अशी कावड यात्रा काढण्यात येणार आहे. खडका येथून गोदावरी गंगेचे पाणी परळी वैजनाथ येथे कावड यात्रेद्वारे आणले जाणार आहे. गोदावरीचे पाणी आणून ज्योतिर्लिंग वैद्यनाथास जलार्पण करण्यात येणार आहे. या कावडयात्रेत भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैद्यनाथ भक्ति मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा