12 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा
बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर 12 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा-प्रा.बी.जी खाडे
परळीवैजनाथ:- बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना (लाल बावटा) च्या वतीने बांधकाम कामगारांच्या प्रश्नांबाबत आदर्श नगर बीड येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर भव्य मोचा 12 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे असे संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी. खाडे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर 12 आँगस्ट रोजी कामगार अधिकारी कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहेत. बांधकाम कामगारांना 20 हजार रुपये दिपवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्या, 2019 प्रमाणे कामगारांना व्यवसायाचे साहीत्य खरेदीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये द्या, ७० वर्षावरील बांधकाम कामगारांना मासीक दहा हजार रूपये पेन्शन द्या, सुरक्षा संच, भांडी संचऐवजी त्याच्या किंमती एवढी रक्कम २० कामगारांच्या खात्यात जमा करा, घरबांधणी योजनेचे अनुदान साडेचार लाख करा, सर्व योजनेचे लाभ अर्ज केल्यानंतर दोन महिन्याच्या आत द्या, बोगस कामगारांची नोंदणी रद्द करा, मृत्यू लाभासाठी विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करा इत्यादी प्रमूख मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आहे.मोर्चा 12 ऑगस्ट रोजी दुपारी १वाजता शिवाजी चौकातून निघून एसटी स्टँड रोड- डी.पी रोड मार्गे आदर्श नगर येथील कामगार अधिकारी कार्यालयावर धडकेल. मोर्चात संघटनेच्या सर्व बांधकाम कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहान संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे, जालिंदर गिरी, उपाध्यक्ष ओम पूरी, संजय जाधव, शेख जावेद गजू पटेल, नविद मौजन, शेख अजहर, प्रकाश वाघमारे, कृष्णा कोबळे, अर्जुन सोळंके यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा