परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 2 ऑगस्टला ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचे आयोजन

 युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत  2 ऑगस्टला ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचे आयोजन 


बीड, दि. 01: महसूल पंधरवाडा निमित्त, जिल्हाधिकारी कार्यालय व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवा कार्य प्रशिक्षण योजनाकरिता बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवारांकरिता ऑनलाईन व ऑफलाइन नोंदणीचे आयोजन शुक्रवार दिनांक 02 ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. 


जिल्ह्यातील विविध शासकीय व खाजगी आस्थापना, सहकारी बँक इत्यादी मध्ये सहा महिने ऑन जॉब ट्रेनिंग घेणे करिता नोंदणी सुरू आहे. यामध्ये नोंदणी केल्यानंतर आस्थापनेच्या आवश्यकतेप्रमाणे निवड झाल्यास बारावी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 6000/-, आयटीआय व डिप्लोमा करिता 8000/-, पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण बेरोजगारांकरिता 10000/-  मानधन/विद्या वेतन पुढील  सहा महिने सदर कार्यालयात, आस्थापनेत, कंपनीत, बँक मध्ये पंजाब प्रशिक्षण पूर्ण केल्यास प्रशिक्षणसह प्रमाणपत्र देण्यात येईल. 


येथे होईल ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी


याकरिता दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड , आयटीआय परिसर चंपावती शाळेच्या मागे नोंदणी करिता 11 ते 05 या वेळेत सर्व कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, श्री सुशील उचले, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांनी केली आहे. 

अधिक माहितीसाठी Beedskill या फेसबुक पेजला भेट द्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!