परळीत आयोजित राजस्तरीय कृषी महोत्सव: 21 तारखेला वाहतूक व्यवस्थेत बदल

परळीत आयोजित राजस्तरीय कृषी महोत्सव: 21 तारखेला वाहतूक व्यवस्थेत बदल


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    परळी वैजनाथ येथे आयोजित राजस्तरीय कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळ्यास  येणाऱ्या मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व अन्य व्हिआयपी दौरा अनुषंगाने वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याबाबत पत्रक जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जारी केले आहे.

        दि. 21/8/2024 ते 25/8/2024 या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शासनाचे वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान परळी ता. परळी जि.बोड येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी दि.21/8/2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री महोदय मान्यवर येणार आहेत. या कार्यक्रमाकरीता बीड जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात नागरीक, शेतकरी, पक्ष संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इत्यादी आपआपली वाहने घेवुन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यक्रमामध्ये वाहातुक कोंडी होऊन जनतेच्या, वर्गीकृत, अवगीकृत व्यक्ती यांचे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणून परळी शहरामध्ये येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. 

         त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, बीड अविनाश बारगळ यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये दिनांक 21/8/2024 रोजी सकाळी 08.00 ते सायं. 6.00 वा.दरम्यान (सभेसाठी जाणारी वाहने, बंदोबस्तातील वाहने, अॅब्युलन्स, आग्निशामक दलाची वाहने वगळून) खालील मार्गावरील सर्व प्रकारची वाहातुक वळविण्यात येणार आहे. याची सर्व वाहन चालक मालक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

● असा असेल बदल....

1.सध्या वापरात असलेला मार्ग: अंबाजोगाई - परळी- गंगाखेड -पर्यायी मार्ग: अंबाजोगाई कन्हेरवाडी बायपास मार्ग गंगाखेड

2.सध्या वापरात असलेला मार्ग: गंगाखेड- परळी-अंबाजोगाई -पर्यायी मार्ग: गंगाखेड- इटके कॉर्नर परळी- टोकवाडी बायपास -अंबाजोगाई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?