94.34% अर्जांची छाननी करून स्वीकृती मोबाईल संदेश

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : बीड जिल्ह्यात 'या' तारखेला पडणार पैसे !


94.34% अर्जांची छाननी करून स्वीकृती मोबाईल संदेश

बीड, 1 : बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 लाख 52 हजार 880 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज दाखल केले असून 94.34 % टक्के अर्जांची छाननी करून मोबाईलव्दारे स्वीकृती संदेश  देण्यात आले आहेत.


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांची नोंदणी आणि अर्जाची पडताळणी करण्याची विशेष मोहीम जिल्हयात सुरू असून याअंतर्गत 3 लाख 52 हजार 880 महिलांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करून 3,32,892 लाभार्थी महिलांच्या अर्जांना स्वीकृती देऊन मोबाईल संदेश पाठविण्यात आलेले असून आजपर्यंत  94.34 %टक्के काम झालेले आहे.


          ज्यांचा ऑनलाईन अर्ज भरतांना कागदपत्राच्या बाबतीत  काही त्रुट्या आढळून आले आहेत. त्यांच्या मोबाईलवर संदेश जात असून अश्या अर्जदार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या मोबाईल ऍप वरून ऑनलाइन अर्ज भरला आहे त्याच मोबाईल मधून अर्ज दुरूस्त (एडिट) करून अर्जाची त्रुटी पूर्तता पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  


ज्या महिला अर्जदारांनी अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडलेले आहेत त्यांचे अर्ज स्वीकृती देण्यात येत आहे. व तसा संदेश महिला अर्जदारांच्या मोबाईलवर जात आहे


 स्वीकृती (Approved) असा संदेश आल्यास आपला अर्ज यशस्वीरिता भरला गेला असल्याचे कळते.  तथापि ज्या महिला अर्जदारांना  आपला अर्ज पार्शली रिजेक्टेड ( partially rejected) असा मोबाईल संदेश आलेला आहे त्यांनी तात्काळ नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ज्या मोबाईल ऍप वरून ऑनलाइन अर्ज भरला आहे त्याच मोबाईल ऍप मधून अर्ज एडिट करून अर्जाची त्रुटी पूर्तता पूर्ण करून घ्यावी,  असे आवाहन, जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी  केले आहे.

●●●●●

रक्षाबंधनापूर्वीच बहिणींना मिळणार ओवाळणी !

 लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला खात्यात जमा होणार, बीड जिल्ह्यातून आतापर्यंत 3 लाख 52 हजार 880 लाभार्थ्यांनी महिलांनी दाखल केले अर्ज, त्या अर्जदार महिलांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता तत्काळ करावी  जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?