कीर्तनकार शि.भ.प.विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे प्रतिपादन

 भौतिक युगात माणसाला सुखाची प्राप्ती व दुःखाचे निस्सारण व्हावे यासाठी नामसंकिर्तन, भजन, प्रवचन, सत्संग यांची आवश्यकता

ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या तपोनुष्ठानात कीर्तनकार शि.भ.प.विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचे प्रतिपादन


परळी वै./प्रतिनिधी

श्रावण मासाचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेले श्री शनि मंदिर  येथे दि.5 ते दि.17 ऑगस्ट पर्यंत ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान व परमरहस्य पारायणास सुरुवात झाली असून सलग 13 दिवस चालणा-या तपोनुष्ठानात परमरहस्य पारायम सोहळ्यास शहर व परिसरातील भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

 सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधताना कीर्तनकार शि.भ.प.विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांनी सांगितले की, ...काही ऐसे करावे,सुखाचे मळे पिकवावे! अमुलाग्र नासून जावे,विघ्न बाधा !! या संतश्रेष्ठ श्री मन्मथ माऊलीच्या उक्तीप्रमाणे भौतिक युगात माणसाला सुखाची प्राप्ती व दुःखाचे निस्सारण व्हावे यासाठी नामसंकिर्तन, भजन,प्रवचन,सत्संग यांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.वसूंधरारत्न डाँ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने  परळी वैजनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेले श्री शनि मंदिर येथे ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांंच्या श्रावणमास तपोनुष्ठानास उत्साहात प्रारंभ झाला आहे. 

13 दिवस चालणा-या तपोनुष्ठान सोहळ्यात श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायण सोहळा, कीर्तन, प्रवचन, वृक्षदान सोहळा, वृक्षारोपण, जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच श्रावणमास तपोनुष्ठान सोहळ्या दरम्यान दररोज प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार रोजीचा महाप्रसाद कै.मुद्रीकाबाई राम तोंडारे यांच्या स्मरणार्थ डॉ.महादेव राम तोंडारे विरार,मुंबई यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गुरुवर्यांची आरती करण्यात आली याकार्यक्रमास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे तरी जनकल्याणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या तपोनुष्ठान, परमरहस्य पारायण  सोहळ्याचा शहर व परिसरातील सर्व शिव भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन द्वादश पंचम् ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या द्वादश श्रावणमास तपोनुष्ठानाचे वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्या पदाधिकार्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार