दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांना मातृशोक

 दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांना मातृशोक




 माजलगाव (प्रतिनिधी):- सिने-नाटय लेखक-दिग्दर्शक  प्रा.डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या मातोश्री केशरबाई उत्तमराव साळवे यांचे गुरुवार दि.८ रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर माजलगाव येथील मंगलनाथ स्मशानभूमीत दुपारी 1 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

     मातोश्री केशरबाई साळवे या गेल्या काही दिवसांपासून आजारी यातच त्यांचे भिमनगर येथील राहत्या निवासस्थानी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्ष होते.  मायाळू स्वभावाची व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ महिला म्हणून त्या परिसरात परिचित होत्या. माजलगाव  नगर परिषदेचे माजी

बांधकाम सभापती राजेश साळवे यांच्या त्या काकू होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

     त्यांच्या निधनाने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी सिने नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज तसेच माजलगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !