23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

आदर्श शिक्षिका स्व. मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मृती निमित्त "मिराई स्कॉलरशिपचे" कु. तपसे सुप्रिया शंकर , कु.तपसे माधवी उत्रेश्वर व कु.तपसे ज्योती दिपक या विद्यार्थीनी यावर्षीच्या मिराई स्कॉलरशिपच्या मानकरी

 आदर्श शिक्षिका स्व. मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या स्मृती निमित्त "मिराई स्कॉलरशिपचे" 


कु. तपसे सुप्रिया शंकर , कु.तपसे माधवी उत्रेश्वर व कु.तपसे ज्योती दिपक या  विद्यार्थीनी यावर्षीच्या मिराई स्कॉलरशिपच्या मानकरी

_____________________________


केज प्रतिनिधी


केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभदिनी लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात मिराई प्रतिष्ठान आयोजित इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या मुलींना प्रतिवर्षी मिराई स्कॉलरशिपचे वितरण करण्यात येते याच अनुषंगाने या हि वर्षी तपसे बंधुनी आपल्या मोठ्या  भगिनी मार्गदर्शिका ज्यांनी आयुष्यभर  महिलांसाठी सामाजिक, शैक्षणिक कार्य करत समाज उभारणीचे कार्य करुन आपल्या अल्प आयुष्यात महिलांना  स्वता: राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सुरू करुन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करणे असो की बचत गटांची संकल्पना महिलांच्या  मनात रुजवने यातुन महिलांना आत्मनिर्भर  बनविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम  केले.


मुळातच कुटुंबातील शैक्षणिक  वातावरणात वाढलेल्या आणि आपल्या  आई - वडिलांचे  शिक्षणाबाबत असलेले  सकारात्मक विचार आंगी आत्मसात करून आयुष्यात  शिक्षणाला महत्त्व देऊन शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत  असताना एकलव्य पुरस्कारसह अनेक  शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळवत उच्च शिक्षण पूर्ण झाल्यावर शिक्षणक्षेत्रात शिक्षिका म्हणून आपल्या  कारकीर्दीत यशस्वी शिक्षिका म्हणून  ज्यांनी कार्य केले. सम्राट अशोक माध्यमिक विद्यालय गोटेगाव शाळेच्या माध्यमातून अविरत 14 वर्षे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा सतत प्रयत्न करत एक आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवत ज्ञानदानाचे कार्य ज्यांनी केले अशा  आदर्श शिक्षिका स्व मिरा शिवदास तपसे (शिनगारे) यांच्या प्रेरणादायी प्रवासाच्या पाऊलखुणा तेवत ठेवण्याचे कार्य आपल्या मोठ्या बहिणीच्या नावे गुणवंत विद्यार्थी स्कॉलरशिप सुरू करुन भावांनी  बहीणीच्या प्रेरणादायी  स्मृतींना डोळ्यासमोर  ठेवून स्थापन केलेल्या "मिराई प्रतिष्ठान" आयोजित गुणवंत विद्यार्थीनींना "मिराई स्कॉलरशिप 2024" चे वितरण लालबहादूर शास्त्री विद्यालय चंदनसावरगाव येथील मुख्याध्यापक श्री.दिलीप देशमुख, सहशिक्षक श्री.बालासाहेब मदन तपसे व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व आयोजक श्री.महेश शिवदास तपसे मिराई प्रतिष्ठान यांच्या शुभहस्ते स्कॉलरशिपच्या यावर्षीच्या मानकरी प्रथम क्रमांक कु. तपसे सुप्रिया शंकर स्कॉलरशिप रु 5000 व सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांक कु. तपसे माधवी उत्रेश्वर स्कॉलरशिप रु.3000 व सन्मानचिन्ह तृतीय क्रमांक कु. तपसे ज्योती दिपक स्कॉलरशिप  रु 2000 व सन्मानचिन्ह देऊन गुणवंतांना गौरविण्यात आले.


याप्रसंगी कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून चंदनसावरगावचे सरपंच जालिंदर दळवी, उपसरपंच शंकर तपसे, सेवा सोसायटीचे चेअरमन संजयकुमार तपसे, मा. सरपंच शत्रुघ्न तपसे, उत्तरेश्वर विष्णू तपसे, धर्मराज तपसे, नामदेव मगर व शाळेतील  सर्व विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक  सर्व गावकरी यांची विशेष उपस्थिती  होती. यावेळी सर्व उपस्थितांचे आभार आयोजक महेश शिवदास तपसे यांनी मानले व सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश अरविंद तपसे, सुरज शेंडगे, विशाल तपसे, अशोक धपाटे, कृष्णा नखाते यांचे सहकार्य लाभले व सर्वांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न झाला .


-----------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?