आ पंकजा मुंडे वाढदिवस:प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
आ. पंकजा मुंडे वाढदिवस:प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप
परळी प्रतिनिधी : लोकनेत्या माजी मंत्री तथा नवनियुक्त विधानपरिषद आमदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमिताने माजी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या वतीने सरस्वती विद्यालयात गरजू व अनाथ मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटलं करण्यात आले.
या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे यांच्या समवेत भाजपा कार्यकर्ते मोहन जोशी,प्रशांत कराड,अमिश अग्रवाल,योगेश पांडकर आदी जण उपस्थित होते.
या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास युवा नेते निळकंठ चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या मध्ये अभ्यासा बरोबरच खेळाचे महत्व विद्यार्थी जीवनात कशा प्रकारे महत्वाचे आहे या बद्दल मार्गदर्शन केले तर विद्यार्थ्यांनी अत्ता पासूनच जीवनात यश मिळवण्यासाठी आपले ध्येय निश्चित करून त्या अनुषंगाने कसा अभ्यास केला पाहिजे या विषयी प्रा पवन मुंडें यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक पर्यवेक्षक श्री श्रीहरी तांबडे सर यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन शाळेचे माजी मुख्याध्यापक सुधीर मिसाळ सर यांनी केले. या प्रसंगी शाळेतील ,रवी गुळभिले सर,तांदळे ये आर,एन एम केंद्रे सर ,दहीफळे व्ही एस ,सिरसाट डी बी ,जाधव एस एस ,सुमित्रा भुतडा मॅडम आदि शिकक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा