युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत वैद्यनाथ मंदिरात तगडा बंदोबस्त !दर्शनासाठी लाखो भाविक होणार दाखल

 श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत वैद्यनाथ मंदिरात तगडा बंदोबस्त !


दर्शनासाठी लाखो भाविक होणार दाखल


  परळी वैजनाथ  / प्रतिनिधी

        हिंदू धर्मातील पवित्र अशा श्रावण मासानिमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या  प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयारी पूर्ण झालेली असून शंभराहून अधिक सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर करडी नजर असणार आहे.देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी वैद्यनाथ मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे.

  ५ ऑगस्ट सोमवार रोजी श्रावण महिन्याला सुरवात होत असून ४ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासुन प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सुरु होणार आहे.मंदिर परिसरात देवस्थाचे सुरक्षारक्षक आणि स्वछता कर्मचारी असणार आहेत.मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची झडती घेऊनच आतमध्ये सोडण्यात येईल.यामध्ये तिन्ही रांगांच्या प्रवेशद्वारावर तपासणी करुन प्रवेश दिला जाणार आहे.

Click:♦️ भक्तांसाठी खास पर्वकाळ: यंदाच्या श्रावण महिन्यात ५ सोमवार!   ७२ वर्षानंतर दुर्मिळ योगायोग!_

         बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त तगडा बंदोबस्त असणार आहे. पाहिल्या श्रावण सोमवारसाठी पोलीसांची करडी नजर असणार असून मंदिराच्या सुरक्षेसाठी एक पोलीस उपअधीक्षक, एक पोलीस निरीक्षक ,१५ सहाय्यक पोलीस निरीक्षक,८७पोलीस कर्मचारी,२१ महिला पोलीस कर्मचारी,एक दंगल नियंत्रण पथक (४० कर्मचारी), १०० होमगार्ड असा तगडा बंदोबस्त असणार आहे.

दर्शन पास १०० रुपयात.......

      प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होय नये यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे दर्शनाच्या तीन रांगा असणार असून महिला, पुरुष यांच्या स्वतंत्र रांगा तर पास धरकांसाठी विशेष रांग असणार आहे हा दर्शन पास १०० रुपयात उपलब्ध होणार आहे.

-------------------------------------------------------




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या