बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई होणार: जनतेने प्रशासनाला आवगत करावे

 बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई होणार: जनतेने प्रशासनाला आवगत करावे 


     बीड, दि. 6 (जि. मा. का.) बोगस वैद्यकीय व्यवसायीक आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निर्देश आज झालेल्या बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत एकत्रितरीत्या घेण्यात आले.

    आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, प्र.पोलीस उपअधीक्षक उमा शंकर कस्तुरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन आर.एम. बजाज, यांच्यासह समितीवरील सदस्य उपस्थित होते. जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची स्थापना महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षक व औषधी द्रव्य विभाग निर्णय क्र.सीआयएम 1099/ प्र.क्र.355/99/अधिनियम/दि. 07/02/2000 अन्वये गठित करण्यात आलेली आहे. या अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात येते. 

आज झालेल्या  बैठकीतील चर्चेनुसार बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर जिल्हयात आढळल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल तसेच नागरीकांना अशी माहिती आढळल्यास त्यांनी प्रशासनाकडे ती दयावी. त्यावर योग्य ती नियमाप्रमाणे कार्यवाही करून माहिती गुप्त ठेवण्यात येईल. 

                                                   000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !