क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती

 क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख यांना सचिव म्हणून पदोन्नती



मुंबई दि. ६ ऑगस्ट

राज्याचे क्रीडा आयुक्त राजेश देशमुख (भा प्र से) यांना सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबतचे आदेश आज निर्गमित केले आहेत. पदोन्नती नंतर त्यांची नियुक्ती आहे त्याच पदावर श्रेणी उन्नत करून कायम ठेवण्यात आली आहे.

डॉ. राजेश देशमुख यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे आणि यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव म्हणून सुद्धा काम त्यांनी पाहिले.

डॉ. राजेश देशमुख अतिशय कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून परिचित असून वेगवेगळ्या पदावर काम करताना त्यांनी आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला आहे.

डॉ. राजेश देशमुख यांना यापूर्वी विविध पदावर काम करत असताना पी.एम. किसान, पी.एम. आवास योजना परिणामकारकरित्या राबवल्याबद्दल केंद्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मान सन्मानित करण्यात आले होते.

 तसेच पुणे जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती मुर्मु यांच्या हस्ते त्यांचा बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. 

याशिवाय त्यांना स्वच्छ भारत अभियान व्यवस्थापन या क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार