ग्रामसेवक परीक्षेत परळीचा अजय ताटे जिल्ह्यात पहिला
ग्रामसेवक परीक्षेत परळीचा अजय ताटे जिल्ह्यात पहिला
परळी वैजनाथ,प्रतिनिधी...
जून महिन्यात घेण्यात आलेल्या ग्रामसेवक पदभरती परीक्षेसाठी निवड यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असुन ग्रामसेवक पद भरतीच्या परीक्षेत परळीचा अजय प्रकाश ताटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
जिल्हा परिषद पदभरती २०२४ मध्ये विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांनी जाहिराती प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आली होती. विविध संवर्गाच्या परीक्षा पार पडल्या. ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा दिनांक१९ जून २०२४ रोजी घेण्यात आली होती. या पदभरतीची निवड यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये परळी वैजनाथ येथील रहिवाशी व सध्या गंगाखेड येथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले अजय प्रकाश ताटे यांनी बीड जिल्ह्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा