गोळीबाराची घटना: पैसे देण्यास नकार दिला: खल्लास करतो म्हणत झाडली गोळी

 गोळीबाराची घटना: पैसे देण्यास नकार दिला: खल्लास करतो म्हणत झाडली गोळी



परळी वैजनाथ : प्रतिनिधी...
      पैशाच्या देवाणघेवाणीतून गोळीबार केल्याची घटना परळी वैजनाथ तालुक्यातील नाथरा येथे सोनपेठ रस्त्यावर शनिवारी दुपारी ३ वाजता घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणात परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
     नाथरा येथील महादेव केशव मुंडे (वय ३७) यांना प्रकाश अशोक मुंडे याने ऊसने ५० हजार रुपये मागितले. हे पैसे देण्यास नकार दिल्याने महादेव मुंडे यांच्या कानाला गावातीलच प्रकाश मुंडे याने गावठी पिस्तूल लावला. गोळीबार करत असतानाच महादेव मुंडे यांनी प्रसंगावधनता बाळगली आणि प्रकाशच्या हाताला झटका मारला. त्यामुळे महादेव मुंडे बचावले. यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. या प्रकरणी महादेव मुंडे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश अशोक मुंडे याच्याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री ८.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी अनिल चोरमले, परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक समाधान कवडे यांच्यासह अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !