गुरुने दिलेले ज्ञान हे पुढच्या पिढीला देणे हीच खरी गुरुदक्षिणा-ॲड.कल्पना देशमुख

 गुरुने दिलेले ज्ञान हे पुढच्या पिढीला देणे हीच खरी गुरुदक्षिणा-ॲड.कल्पना देशमुख 



परळी (प्रतिनिधी)

 भारताला गुरु-शिष्यांची पवित्र परंपरा असुन गुरूकडून मिळालेले शिक्षण पुढच्या पिढीला देणे हीच खरी गुरुदक्षिणा असुन या गुरुदक्षिणेचे महत्व संगितक्षेत्रात अधिक असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका,सामाजीक कार्यकर्त्या ॲड.कल्पना देशमुख यांनी केले.तुकाराम जाधव व सौ.दिपीका जाधव यांच्या सुरसंगम संगित विद्यालयाच्या वतिने गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने संगित परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्र वितरण कार्यक्रमात बोलत होत्या.

 परळी शहरातील अंध कलाकार तुकाराम जाधव व सौ.दिपीका सावजी-जाधव हे दाम्पत्य सुरसंगम संगित विद्यालयाच्या माध्यमातुन संगित क्षेत्रात कार्य करत आहे.या संगित विद्यालयाच्या वतिने दरवर्षी गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.रविवार दि.4 ऑगस्ट रोजी सुर्वेश्वर मंदिर येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर मुंडे  संध्या च्या पिढीला गुरू शिस परपरा जमन्याची फार गरज असे अध्यक्षीय भाषणात सांगितले तर प्रमुख पाहुणे म्हणुन दिव्य मराठी तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव डॉ गणेश सावजी,बालाजी सावजी माजी नायब तहसीलदार भास्कर सावजी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, तबला वादक बबन मस्के, संतोष पंचाक्षरी,पत्रकार धिरज जंगले आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना ॲड.कल्पना देशमुख यांनी सुरसंगम संगित विद्यालयाने परळी शहरातील संगितक्षेत्राला नवा आयाम दिला असुन तुकाराम जाधव  व दिपीका जाधव या अंध दाम्पत्याने जोपासलेल्या या कलेला डोळस समाजाने पाठबळ देण्याची गरज असल्याचे सांगितले.प्रास्ताविकात तुकाराम जाधव यांनी सुरसंगम संगित विद्यालय चालवण्यामागचा उद्देश सांगुन लहान वयात संगिताचे शिक्षण घेतले तर तो विद्यार्थी संगितक्षेत्रात परिपूर्ण होतो असे सांगुन संगित विषया च्या तीन परिक्षा झाल्यास दोन टक्के तर पाच परिक्षा झाल्यास तीन गुणा मध्ये वाढ होते.परिक्षा इयत्ता दहावी मध्ये गुणवाढीसाठी महत्वाची असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे संचलन कु. नेतल संजय शर्मा तर आभार प्रदर्शन सौ.दिपीका जाधव यांनी केले.

@@@@@@

 पंधरा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

या कार्यक्रमात अ.भा.गांधर्व मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या गायन,वादन परिक्षेचे  सुवर्णा जंगले,रियास रुद्रवार,रिध्दीमा रुद्रवाड,अतिश्री कलशेट्टे,साची तोतला,अविका तोतला,शिया तोतला,कृतिका टाक,स्वतेजा जबदे,जानवी चव्हाण,स्वरा चव्हाणप्रविण कदम,वैभवी गुळवे,शिवानी सलगरे,राधिका बजाज,कस्तुरी खोत यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रिका वितरण करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?