युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

श्रावणमास: सोमवारपासून सुरुवात अन् सोमवारीच समाप्ती !

भक्तीसाठी खास पर्वकाळ: यंदाच्या श्रावण महिन्यात ५ सोमवार!

७२ वर्षानंतर दुर्मिळ योगायोग!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
          सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं.यावर्षी खास पर्वकाळ असणार आहे.यंदा श्रावणात पाच सोमवार असणार आहेत. यावेळी ७२ वर्षांनंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे. विशेष म्हणजे, श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी होत आहे.

            मराठी पंचांगानुसार ५ ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे. श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योग ७२ वर्षांपूर्वी तयार झाला होता. २७ जुलै १९५३ रोजी सोमवारी श्रावण महिना सुरू झाला होता. यावेळी श्रावणामध्ये सहा शुभयोगही तयार होत आहेत. हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या सण-उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण-उत्सव येतात. या मराठी महिन्यांमध्ये महत्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना होय. या श्रावण महिन्याला विशेष असे महत्व आहे.यंदा श्रावण महिना हा ५ ऑगस्ट २०२४ सुरू होतोय व २ सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे.
          यंदाच्या श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्रावण महिना हा सोमवार पासूनच होत आहे. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत. या महिन्यात शिवाचा महारुद्रभिषेक करावा. नियमित व्रत करावे. शिवाचा अभिषेक करत १०८ वेळा रोज बेल वाहावे.भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतींची खास पूजा केली जाते. महादेवांना  समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांनाच समर्पित आहे. ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते, अशी धार्मिक मान्यता आहे.  
⭕️असे आहेत श्रावणी सोमवार....

• पहिला श्रावणी सोमवार – ५ ऑगस्ट २०२४

• दुसरा श्रावणी सोमवार – १२ ऑगस्ट २०२४

• तिसरा श्रावणी सोमवार – १९ ऑगस्ट २०२४

• चौथा श्रावणी सोमवार – २६ ऑगस्ट २०२४

• पाचवा श्रावणी सोमवार – २ सप्टेंबर २०२४

⭕️ दर सोमवारची शिवमुठ
            पहिल्या सोमवारी शिवमूठ तांदूळ वाहावे.दुसऱ्या सोमवारी शिवमूठ तीळ वाहावे. तिसऱ्या सोमवारी शिवमूठ मूग वाहावे. चौथ्या सोमवारी शिवमूठ जव वाहावे. पाचव्या सोमवारी शिवमूठ हरभरा वाहावे.

⭕️यंदा श्रावणात अनेक शुभयोग
           यंदा श्रावण महिन्यात शुक्रादित्य योग, बुधादित्य योग, नवपंचम योग आणि गजकेसरी योग तयार होत आहेत.या शिवाय कुबेर योग आणि षष्ठ योगही तयार होत असल्याने या महिन्याचे महत्व अधीकच वाढले आहे. सर्वार्थ सिद्धीसह श्रावणात तीन शुभयोगांची सुरुवात श्रावणाचा पहिला दिवस सोमवार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. या योगात श्रावणाला सुरुवात होणं, अत्यंत शुभ मानलं जातं.

▶️▶️
(*प्राप्त माहितीनुसार वाचकांसाठी माहितीस्तव)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या