श्रावणमास पर्व : श्री केदारेश्वर मंदिर व परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नाथ शिक्षण संस्थेकडून आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट

 श्रावणमास पर्व : श्री केदारेश्वर मंदिर व परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नाथ शिक्षण संस्थेकडून आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 

  अंबाजोगाई शहरातील जागृत देवस्थान श्री केदारेश्वर मंदिर व परिसरात राज्याचे कृषीमंत्री तथा बीडचे पालकमंत्री  ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने श्रावणमास पर्व निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली असल्याची  माहिती नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी केले आहे.

 सोमवार दि.०५ ऑगस्ट पासून पवित्र श्रावणमास महिन्यास सुरुवात होत आहे. अंबाजोगाई शहरातील जाग्रत देवस्थान  श्री केदारेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी श्रावणमासासात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्थेच्या कडून श्री केदारेश्वर मंदिरात मनमोहक विद्युत रोषणाई, पुष्पसजावट करण्यात आली आहे. विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर,गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.हर हर महादेवचा जयघोष करत श्री केदारेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण झाले आहे. श्रावणमास पर्व : श्री केदारेश्वर मंदिर व परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी नाथ शिक्षण संस्थेकडून आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली असल्याची माहिती नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !