युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

 श्री गुरुपादेश्वर शिवाचार्या महाराज गिरगावकर यांचे आज पासून अनुष्ठान


   श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन


परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)

          पवित्र श्रावणमासानिमित्त श्री गुरुपादेश्वर शिवाचार्या महाराज गिरगावकर यांचे आज पासून प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात अनुष्ठान सुरू होणार असून यानिमित्ताने अनेक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.०४) श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. पुजा,आरती केली.

       श्रावणमास निमित्त गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज, गिरगांवकर यांचे ५ ते १७ आँगस्ट दरम्यान श्री.शनी मंदीर देवस्थान, वैद्यनाथ मंदीरच्या पायथ्याशी श्रावणमास तपोनुष्ठान सुरू होणार आहे. श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायम सोहळा, कीर्तन, प्रवचन, वृक्षदान सोहळा, वृक्षारोपण, जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबीर,सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने रविवारी श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांचे विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराजांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पुजा, आरती केली. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्री गुरुपादेश्वर महाराजांचे वैद्यनाथाची प्रतिमा, पुष्पहार देवून विश्वस्त राजेश देशमुख, प्रदिप देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी विरशैव लिंगायत समाजाचे समाजबांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या