किसानपूत्र मनोज करे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

 किसानपूत्र मनोज करे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड



गंगाखेड (प्रतिनिधी) : गंगाखेड तालुक्यातील पोकर्णी (वाळके ) येथी अल्प भूधारक सुमनबाई आणि महादेव करे या कष्टाळू शेतकरी दांपत्याचा मुलगा मनोज करे यांची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. मनोज करे यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

पोकर्णी (वाळके) येथील अल्पभूधारक शेतकरी दांपत्य सुमनबाई आणि महादेव करे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मनोज यांना शिक्षण दिले. शेतीच्या उत्पन्नात शिक्षण देणे खूप जिकिरीचे होते. परंतु महादेव आणि सुमनबाई यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या. मनोज यांनीही अत्यंत तुटपुंज्या साधन सामग्री मध्ये जिद्दीने अभ्यास केला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार