पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून डॉ संतोष मुंडे यांच्या प्रयत्नातून सुविधा
परळी उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी मिळणार अपंगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र
दिव्यांगांसाठी अतिशय उपयुक्त सुविधा: उपसरपंच भगवान पौळ
परळी : प्रतिनिधी...
दिव्यांगाना त्यांच्या अपंगत्वाचे प्रप्रमाणपत्रि मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, वारंवार शासकीय रुग्णालयात चकरा माराव्या लागत होत्या, त्यात दिव्यांगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र आणि या त्रासात सुद्धा अनेक कि. मी चा प्रवास करून त्यांना हे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळत नसे, कधी कामकाज बंद, तर कधी अधिकारी जागेवर नाहीत एक ना अनेक अशा समस्यांचा सामना करून कुठे त्यांना हे प्रमाणपत्र मिळे.
या सर्व अडचणी जेव्हा दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांच्या लक्षात आल्या त्यावेळी त्यांनी पुढाकार घेतला, आणी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा पालकमंत्री बीड जिल्हा ना.धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून डॉ संतोष मुंडे यांनी या संदर्भात बीडचे जिल्हा चिकित्सक डॉ अशोक बडे यांना ऑनलाईन प्रमाणपत्रा संदर्भात पत्र देऊन, ऑनलाईन प्रमाणपत्राची सुविधा परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू करावी अशी सूचना केली.
त्याच अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी परळी येथे दिव्यांगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळण्याची तसेच, नूतनीकरण, सुविधा सुरू केली आहे. महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी अपंगांचे ऑनलाईन प्रमाणात मिळणार आहे. तरी दिव्यांगांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवान पोळ (उपसरपंच रामेवाडी) यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा