इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

लातूर येथे संपन्न झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांची आग्रही मागणी

 विधानसभा निवडणुकीत परळीची जागा  काँग्रेसला सुटणार व निवडणूक लढवणार- ॲड अनील मुंडे 



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत लातूर येथे संपन्न झालेल्या बैठकीत काँग्रेस कार्यकर्त्यांची आग्रही मागणी 

परळी वैजनाथ दि ११ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून यापूर्वीही काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवीत काँग्रेसच्या उमेदवाराने मोठे मताधिक्य मिळवले आहे. तेव्हा येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून परळीची जागा काँग्रेसला सुटणार व आपणच निवडणूक लढवणार अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲड अनिल मुंडे यांनी दिली.

काल राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथाला,  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, अमित देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आढावा घेतला. सदर बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने वर्धा लोकसभा मतदारसंघ तडजोडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला त्याच धर्तीवर बीड जिल्ह्यातील परळी, बीड आणि गेवराई मतदार संघाची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली.

याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲड अनिल मुंडे बोलताना म्हणाली की, परळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असून ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षाने या ठिकाणच्या निवडणुका लढवल्या त्या त्या वेळेस काँग्रेसच्या उमेदवाराने ६० ते ७० हजार मतदान घेतले आहे. या अगोदर सन २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा सोडण्यात आली नव्हती मात्र यंदा काँग्रेसला पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघासह वरील प्रमाणे जागा काँग्रेसला सोडण्यात याव्यात. 

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने जर आपणास उमेदवारी दिली तर आपण परळी तालुक्यातील सिंचन, रस्ते, आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी प्रामाणिकपणाने काम करू असे सांगून ॲड अनिल मुंडे म्हणाले की, आपण परळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष असताना सन २०११-१२ दरम्यान परळी तालुक्यातील नागापूर येथे वाण प्रकल्पावर डावा व उजवा कालवा असून त्यावरी वितरिका (चाऱ्या) आहेत परंतु सर्व कालवे (चाऱ्या) ह्या मोडल्या असल्याने त्यावेळी आपण तात्कालीन राज्यमंत्री मा राजेंद्र मुळक यांच्याकडे कालवा व चाऱ्या दुरुस्तीसाठी आढावा बैठक घेतली होती सदर आढावा बैठकीत मा राज्यमंत्री महोदयांनी वाण प्रकल्पावरील कालवा व चाऱ्या दुरुस्तीसाठी जवळपास तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश दिले होते मात्र २०१४ दरम्यान राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर या कामास गती मिळाली नाही. वाण प्रकल्पाची पाणीसाठाक्षमता १९.७०७१ दलघमी असुन यातील कांही पाणीसाठा शेतीसाठी राखीव ठेवण्यात आला होता मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी सर्वच पाणीसाठा शेती सोडून आरक्षित केले आहे. मात्र आगामी काळात हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अग्रक्रमाने प्रयत्न करू असेही ॲड अनिल मुंडे म्हणाले.

आपण २००९-१० दरम्यान परळी वकील संघाचे अध्यक्ष असताना तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री यांच्याकडे त्यांच्या दालनात बैठक लावून परळी न्यायालयासाठी पाटबंधारे खात्याची इमारत व दोन एकर जागा मिळवून दिली होती असे सांगून ॲड अनिल मुंडे म्हणाले की, परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी सन २००८ ते २०१२ दरम्यान तालुकास्तरीय कृषी प्रदर्शने आयोजित केलेली आहेत. त्याचबरोबर परळी शहरवासियांच्या रेल्वे प्रश्नाबरोबरच मतदार संघातील विविध ज्वलंत कामासाठी आपण आंदोलने, उपोषणे केलेली असून पक्षाने जर आपणास उमेदवारी दिलीच तर आपण नक्कीच निवडणूक जिंकू ही 'काळ्या दगडावरची पांढरी रेघ' आहे असेही ॲड अनिल मुंडे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या