शौर्य सीएनजी पंपाचे उद्घाटन
शौर्य सीएनजी पंपामुळे प्रदूषणावर मात होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना मिळेल - कृषिरत्न श्री. बी.बी.ठोंबरे
परळी प्रतिनिधी. परळी शहरात स्थापन झालेला शौर्य सीएनजी पंप नॅचरल शुगर, रांजणी येथे निर्माण होत असलेल्या बायो सीएनजी तत्वावर आधारीत असल्यामुळे परळी परिसरात होणाऱ्या वाहन प्रदूषणावर मात होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालणा मिळेल असे उद्गार कार्यक्रमाचे उद्घाटक, नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज, रांजणीचे चेअरमन कृषीरत्न श्री बी. बी. ठोंबरे यांनी केले.
परळी शहरात आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी शौर्य सीएनजी पंपाचे उद्घाटन नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज चे चेअरमन श्री बी. बी. ठोंबरे व शौर्य सीएनजी पंपाच्या संचालिका सौ.उषा किरण गित्ते यांच्या हस्ते तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणासाठी आपण हरित उर्जेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. नविन अत्याधूनिक तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनातून बायो सीएनजी तयार करणे शक्य झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नामध्ये वाढ होण्याबरोबर वाहन प्रदूषण देखील नष्ट होईल. ही बाब लक्षात घेवून आम्ही नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज मध्ये बायो सीएनजी उत्पादनाचा निर्णय घेतला. पेट्रोलियम पदार्थापासून तयार होणाऱ्या सीएनजी पेक्षा बायो सीएनजी ५% जास्त शुद्ध आहे. त्यामुळे प्रती किलो सीएनजी मागे वाहणांची सरासरी देखील २-३ कि मी जास्त मिळते. स्थानिक पातळीवर निर्मिती होत असल्यामुळे बायो सीएनजीची किंमत देखील किफायतशीर आहे. शौर्य सीएनजी हे आमचे पहिले वितरक असून परळीकरांना याचा सर्वात अगोदर लाभ होणार आहे, असे श्री ठोंबरे साहेब म्हणाले.
परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला देण्यात आली. म्हणून परळी परिसराशी माझी नाळ जोडली गेलेली आहे असे मत व्यक्त श्री.बी.बी ठोंबरे यांनी व्यक्त केले.
शौर्य सीएनजी च्या संचालिका सौ.उषा किरण गित्ते यांनी परळीकरांसाठी बायो सीएनजी ची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे श्री ठोंबरे यांचे धन्यवाद व्यक्त केले. परळीकरांना लागणाऱ्या सीएनजीचा कधीही तुटवडा होणार नाही याची ग्वाही ठोंबरे साहेबांनी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषिभूषण श्री पांडुरंग साहेबराव आवाड, संचालक नॅचरल शुगर व अध्यक्ष , श्री साई पतसंस्था रांजणी, श्री. ज्ञानेश्वरराव काळदाते , जेष्ठ संचालक नॅचरल शुगर, श्री संभाजी रेड्डी, संचालक नॅचरल शुगर, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.दिनकर मुंडे (गुरुजी) व परळी तालूक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखाना उभारणीत स्व गोपिनाथराव मुंडे साहेब यांना श्री बी बी ठोंबरे यांनी केलेल्या अमूल्य सहकार्याची आणि पहिल्याच गाळप हंगामामध्ये राष्ट्रिय पुरस्कार मिळवल्याची आठवण श्री दिनकर मुंडे गुरूजी यांनी आपल्या भाषणात केली.
कार्यक्रमाचे संचलन श्री महेश मुंडे आणि आभार प्रदर्शन शौर्य किरण गित्ते यांनी केले. कार्यक्रमात परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा