विशाल राष्ट्रध्वजाची वैद्यनाथ मंदीर प्रांगणात उभारणी करावी-योगेश पांडकर
विशाल राष्ट्रध्वजाची वैद्यनाथ मंदीर प्रांगणात उभारणी करावी-योगेश पांडकर
परळी प्रतिनिधी: परळी शहरालगत असलेल्या बालाघाट डोंगरावरील १५० फूट उंचीचा विशाल तिरंगा ध्वजाचे १३ ऑगस्ट २०२२ साली पालकमंत्री ना.धनंजय मुंडे ,माजी खा.प्रीतमताई मुंडे,जिल्हाधिकारी, तहसीलदार,नगर परिषदेचे मुख्याधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडून फडकवला होता.
आपल्या परळी ची शान वाढवत परळीच्या पंचक्रोशीतून हा ध्वज दिसत होता तसेच परळी शहरात प्रभू वैजनाथाचं दर्शन घेण्यासाठी देशातून अनेक भाविक येत असतात त्यांनाही हा तिरंगा ध्वज आकर्षित करत असत पण मागील काही महिन्यात हा ध्वज दिसत नसून फक्त खांब दिसत आहे.
नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले होते पण काही दिवस हा ध्वज फडकवून नंतर काढून घेतात.
हा तिरंगा ध्वज डोंगरावर असल्याने वाऱ्याचा वेग जास्त येत असेल आणि त्यामुळे काही अडचणी येत असतील तर या ध्वजाची जागा बदलून प्रभू वैद्यनाथ मंदिर च्या प्रांगणात फडकवला जाऊ शकतो.
स्वातंत्र दिवस जवळ येत आहे त्यामुळे १५ ऑगस्ट पूर्वी हा १५० फुटी विशाल तिरंगा ध्वज फडकवला जावा आणि वैद्यनाथ मंदिर जवळील प्रांगणात जागा निश्चिती करून कायम स्वरूपी तिरंगा फडकवला जावा अशी मागणी भाजयुमोचे शहर संघटक योगेश पांडकर यांनी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा