परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

शिक्षक चांगला असल्यास भावी पिढी घडू शकते- पो नि धनंजय ढोणे

 केळूसकर गुरुजी सारखे आदर्श शिक्षक लाभले तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महामानव घडतात-चेतन निसर्गंध


शिक्षक चांगला असल्यास भावी पिढी घडू शकते- पो नि धनंजय ढोणे 


परळी/ प्रतिनिधी


        केळूसकर गुरुजी सारखे आदर्श शिक्षक लाभले तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे महामानव घडतात, असे प्रतिपादन फुले -आंबेडकरी अभ्यासक चेतन निसर्गंध यांनी केले. ते स्टुडन्ट फॉर                 रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी व फुले - आंबेडकरी अभ्यास समूहाच्या वतीने आयोजित दादा केळूसकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रबोधनपर चर्चासत्राचे  उद्घाटक म्हणून परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, परळी औ. विद्युत केंद्रचे सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, ए.तू.कराड, रानबा गायकवाड, नवनाथ दाणे व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा प्रविण फुटके उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दादा केळूसकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी सांगितले की, शिक्षक चांगला असल्यास भावी पिढी घडू शकते, आजच्या शिक्षकांनी आदर्श पिढी घडवावी असे विचार व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना चेतन निसर्गंध म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व खाजगी आयुष्यात केळूसकर गुरुजी यांनी शेवट पर्यंत साथ दिली. केळूसकर गुरुजी यांनी गौतम बुद्ध, क्षत्रिय कुलावंत छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांचे चरित्र मराठीत पहिल्यांदाच लिहिले थाँम्स पेन यांच्या राईट आँफ मँन इंग्रजी पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव गायकवाड महाराजांकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली. मात्र ते उपेक्षित राहिले. तर अध्यक्षीय समारोपात प्रा फुटके यांनी आजच्या शिक्षकांनी केळूसकर गुरुजींचा आदर्श घेवून विद्यार्थी घडवावेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुले - शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक भगवान साकसमुद्रे यांनी केले. कार्यक्रमात शरद राठोड, प्रविण जाधव, ए.तू कराड यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास पत्रकार श्रीराम लांडगे, परमेश्वर मुंडे, न प चे महदु मस्के, एसबीआयचे जयपाल कांबळे, महेश मुंडे, हरिभाऊ आगलावे,फुले - आंबेडकरी अभ्यास समूहाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  आभार प्रदर्शन आकाश देवरे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!