23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

परळीत भरवस्तीत घरफोडी, सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

 परळीत भरवस्तीत घरफोडी, सव्वादोन लाखाचे दागिने लंपास


परळी (प्रतिनिधी)

 परळी शहरातील गजबजलेल्या स्नेहनगर भागात शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी पहाटे धाडसी चोरी झाली असुन कपाटात ठेवलेले 2 लाख 28 हजार 500 रुपयांचे  सोन्या चांदीचे दागिणे लंपास केल्याची घटना घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 परळी शहरातील स्नेहनगर भागातील गोपाल श्रीकिशन पुरोहित यांच्या घराचे कुलुप तोडुन शुक्रवार दि.9 ऑगस्ट रोजी पहाटे 2 ते 4 च्या दरम्यान घरात प्रवेश करुन कपाटाच्या लॉकर मध्ये ठेवलेले तीन तोळ्याचे मंगळसूत्र,एक तोळ्याच्या बिंदीया,दोन तोळ्याच्या अंगुठा,एक तोळ्याची साखळी,चांदीचे शिक्के,चैन,ग्लास,जोडवे असे 2 लाख 28 हजार 500 रुपयांचे दागिणे लंपास केले आहेत.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 331(4),305 बीएनएस 2023 कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने हे करत आहेत.

..............

शहरात मोठा गाजावाजा करत CCTV बसवूनही छोटे मोठे गुन्हे सतत घडत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी रात्रगस्तीचे प्रमाण वाढवण्याची मागणी नागरिकांतुन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?