परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सभेनी केली परळी तहसील कार्यालय निदर्शने
परळी ता.8 प्रतिनिधी
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे, शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर लावलेले होल्ड काढावेत, वाण धरणावरील तोडलेली वीज तात्काळ जोडून द्यावी, मागच्या वर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. या मागणीसाठी गुरुवारी ता.8 महाराष्ट्र राज्य किसान सभेनी परळी तहसील कार्यालयावर निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ सुदाम शिंदे, कॉ भगवान बडे, धनंजय सोळंके, कॉ मनोज देशमुख, कॉ पप्पु देशमुख आदींची उपस्थिती होती. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी स्वीकारले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा