#mbnews........सावता महाराज पुण्यतिथी निमित्त कीर्तन महोत्सवास सुरुवात ; शनिवारी भव्य मिरवणूक
संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त कीर्तन महोत्सवास सुरुवात ; शनिवारी भव्य मिरवणूक
पाटोदा/ अमोल जोशी
शहरातील श्री संत सावता महाराज मंदिर माळेगल्ली येथे प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही सावता महाराज पुण्यतिथी निमित्त कीर्तन व महोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 30 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले आहे दररोज सायंकाळी 6 ते 9 या वेळेत संत सावता महाराज चरित्र पोथी वाचन ह.भ.प. रघुनाथ शेवाळे व श्रीमती भिमाताई गोवर्धन जाधव हे करत आहेत, मंगळवारी रात्री हनुमान महाराज येवले तर बुधवारी रात्री संतोष महाराज वणवे यांची कीर्तन सेवा झाली. आज गुरुवार रोजी शालिनीताई नांदे महाराज व शुक्रवारी रात्री 9 ते 11 विठ्ठल रुक्मिणी संस्थान चे मठाधिपती सतीश महाराज उरणकर यांची कीर्तन सेवा होणार आहे तसेच आज पाटोदा येथून तीर्थक्षेत्र अरण येथे ज्ञानज्योत आणण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. शनिवारी सकाळी 9 ते 11 संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त सावता महाराज प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक माळेगल्ली , काळा हनुमान ठाणा,रस्ता गल्ली , भामेश्र्वर मंदिर मार्गे सावता मंदिरात पोहचेल .या ठिकाणी सकाळी 11 ते 1 विठ्ठलगड संस्थान पाटोदा चे मठाधिपती ह.भ प. रामकृष्ण रंधवे बापू महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार असून या नंतर महाप्रसाद वाटप होणार आहे यंदा ज्योत पंगत शाहू भगवान रंधवे यांची तर महाप्रसाद पंगत किरण विश्वनाथ गोरे यांची होणार आहे या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत सावता महाराज तरुण मित्रमंडळ पाटोदा यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा