Mbnews.....संघाचे उत्कृष्ट सादरीकरण
समरगीत स्पर्धेत परळीच्या संघाला तृतीय पारितोषिक
श्रमानेच उध्दार या गीताला मिळाले बक्षीस
संघाचे उत्कृष्ट सादरीकरण
परळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धेचे लातुर येथील कामगार कल्याण भवनात बुधवारी (दि. ३१जुलै) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परळीच्या समरगीत संघाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण जेष्ठ कवी योगिराज माने, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, शंकर जगतात, रूपाली नाईक, विजय धायगुडे, पत्रकार धीरज जंगले यांच्या उपस्थितीत झाले.
परळीच्या समरगीत संघाने कामगारांच्या कामावर आधारित श्रमानेच उध्दार हे समरगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संघाने उत्कृष्ट सांघिक सादरीकरण केल्याने तृतीय क्रमांकांचे बक्षीस मिळविले.
या संघात सुरसंगम संगीत विद्यालय व फाऊंडेशन शाळेच्या विद्यार्थिनीं कृतिका टाक, सिया तोतला, नेतल शर्मा, श्रीजा दहातोंडे, साक्षी सावजी, नेतल दाड, सिद्धी सानप, पुजा शिंदे, आरूषी होलानी, शिवानी सलगरे, वैभवी सावजी यांचा सहभाग होता. तर पेटीवादकाची साथ संगीत शिक्षक तुकाराम जाधव यानी दिली. आणी नैतिक गिरी यांनी तबलावादन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा