हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत रेड अलर्ट
हवामान विभागाकडून बीड जिल्ह्याला रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत रेड अलर्ट
परळी वैजनाथ:मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Rain Update) शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.बीड जिल्ह्याला रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला असुन नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आज रोजी रात्री 07 ते 10 वाजेपर्यंत IMD Mumbai ने दिलेल्या अलर्ट नुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील *छत्रपती संभाजीनगर,जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याना Red alert* तर परभणी या जिल्ह्याला orange alert तर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याना yellow alert देण्यात आलेला असून त्यानुषंगाने सर्व जिल्ह्यानी आवश्यक ती खबरदारी घेऊन नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देऊन आवश्यकता असल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे. तसेच संबंधित यंत्रणाना सुसज्ज ठेवून घडणाऱ्या घटनाची माहिती तात्काळ प्रशासनास कळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा