युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

शेती पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीस विहित मर्यादेत कळवावी - मुंडेंचे आवाहन

 पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश


शेती पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीस विहित मर्यादेत कळवावी - मुंडेंचे आवाहन


बीड जिल्ह्यातील नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, रात्रीतून काही नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता - धनंजय मुंडे यांचे जनतेला आवाहन


मुंबई (दि. 01) - संपूर्ण बीड जिल्ह्यात 31 ऑगस्ट पासून ते आतापर्यंत सातत्याने सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरून नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याची बातमी जरी आनंददायक असली, तरी सततच्या पावसाने अतिवृष्टी व काही ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे खरीप हंगामातील शेती पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर काही महसूल मंडळांमध्ये 24 तासांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला असून, राज्य शासनाच्या महसूल विभागाने यापूर्वीच काढलेल्या आदेशाला अनुसरून महसूल व कृषी विभागाने पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांच्या तसेच घरांच्या पडझडीच्या आदी नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व शेती पिकांच्या 33% च्या मर्यादेपेक्षा जास्त नुकसानीचे अहवाल राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीसह तातडीने पाठवावेत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 


बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग घेतला असून आपल्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार विमा कंपनीला देखील निर्धारित वेळेत कळवावी, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचे ही संरक्षण लागू राहील, असेही आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


दरम्यान सध्या जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून त्याउपर नद्यांमधून व नाल्यांमधून पाणी वाहत आहे. पावसाचा जोर आणखी पुढील 24 तास जर इतकाच प्रखर राहिला तर काही नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात व त्यामुळे नदीकाठच्या गावांना किंवा नदीकाठच्या शहर वस्त्यांना देखील पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.  त्यामुळे विशेष करून जलाशय व नदीकाठच्या गावच्या नागरिकांनी सतर्क रहावे या आवाहनासह नदीच्या पूर नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यात यावे अशा पद्धतीच्या सूचना देखील धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या