अतिवृष्टीमुळे पिक वाया, बॅंकेचा वसुलीसाठी तगादा, शेतकऱ्याची आत्महत्या
अतिवृष्टीमुळे पिक वाया, बॅंकेचा वसुलीसाठी तगादा, शेतकऱ्याची आत्महत्या
परळी (प्रतिनिधी)
मागील काही दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतातील पिक नासल्याने व बॅंकेचे कर्मचारी कर्जवसुलीसाठी दारात आल्याने चिंताग्रस्त झालेल्या 50 वर्षीय शेतकर्याने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना परळी शहरातील गंगासागर नगर येथे घडली.
परळी व तालुक्यात मागील आठ दिवसापासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतातील पिके उध्वस्त होत आहेत.परळी शहरातील गंगासागर नगर भागातील रहिवासी असलेले धनंजय रामकृष्ण राऊत वय ५५ यांना लोणी शिवारात तीन एकर जमीन असुन त्यांच्याकडे दोन बॅंकांचे कर्ज आहे.पावसाने पिक वाया गेलेले असताना दोन्ही बॅंकेचे कर्मचारी दि.4 सप्टेंबर रोजी शेतकरी राऊत यांच्या घरी वसुलीसाठी आल्याने आपण हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेत त्यांनी दि.4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.ही बाब घरातील नातलगांना समजताच त्यांनी धनंजय यांना परळी उपजिल्हा रुग्णालयात हलविले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी स्वा.रा.ति.रुग्णालय अंबाजोगाई येथे हलविले असता रात्री 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला.गुरुवार दि.5 सप्टेंबर रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर परळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.राऊत यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा