शिक्षणाधिकारी श भगवानराव फुलारी यांची सदिच्छा भेट

 संस्कार प्राथमिक शाळा अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं कार्य करत आहे. - प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवानराव फुलारी


संस्कार प्राथमिक शाळेत शिक्षक दिनी शिक्षणाधिकारी श भगवानराव फुलारी यांची सदिच्छा भेट


परळी (प्रतिनिधी) : शहरातील पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळेत आज श्री.भगवानराव फुलारी साहेब (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, बीड) तसेच श्री कनाके साहेब (गटशिक्षणाधिकारी, परळी वै.), श्री गोविंद कराड साहेब (विस्तार अधिकारी, परळी वै.) तसेच श्री प्रकाश चाटे व श्री अशोक कराड यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष श्री कैलास तांदळे व सचिव श्री दीपक तांदळे यांनी यथोचित सत्कार केला.

      यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भगवानराव फुलारी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांसमवेत शिक्षक दिन साजरा केला. 

     यावेळी त्यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, "आज शिक्षक दिना दिवशी संस्कार प्राथमिक शाळेला अचानक भेट देऊन एक चांगला अनुभव आला कारण शाळा व शाळेचा परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर दिसला.शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी गणवेशात उपस्थित होते. अतिशय शिस्तप्रिय वातावरणात शाळा सुरू होती. विद्यार्थ्यांची उपस्थिती ही खूप चांगली आहे. शिक्षक व शिक्षकांचे अध्यापन उत्कृष्ट पद्धतीने चालू होते. शाळेचे सर्व नियोजन पाहता संस्कार शाळा अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम करत आहे. संस्कार प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व भावनिक विकास करण्यासाठी नेहमीच तत्पर असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांच्यात गुणवत्ता निर्माण करणे यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद मेहनत करत असतात. शाळेचे कार्य पाहता शाळा एक आदर्श व संस्कारक्षम पिढी निर्माण करत आहे."

      यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री भगवानराव फुलारी साहेब यांनी संस्कार प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकांना पुष्प देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व पुढील शैक्षणिक कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?