इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

निवडणूक जिंकण्यासाठी सकारात्मकतेने कामाला लागण्याचे केले आवाहन

आ.पंकजाताई मुंडे यांच्यावर पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी  ; चिंचवड येथून केली आढावा दौऱ्याची सुरवात

निवडणूक जिंकण्यासाठी सकारात्मकतेने कामाला लागण्याचे केले आवाहन ; उद्या वडगाव शेरी, शिरूर मतदारसंघात जाणार

पुणे ।दिनांक ०३।

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आ. पंकजाताई मुंडे यांच्यावर भाजपने पुण्यातील पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगाने आजपासून त्यांनी या मतदारसंघाचा आढावा दौरा सुरू केला असून आज चिंचवड येथे मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपणच जिंकणार आहोत, यात कसलेही दुमत नाही तथापि, सर्वांनी सकारात्मकतेने कामाला लागावे असं आवाहन त्यांनी केलं. 


   भाजपच्या विधानसभा प्रवास योजनेअंतर्गत चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आ. पंकजाताईंचे दुपारी पुण्यात आगमन झाले. चिंचवड येथे आरंभ हाॅल येथे बैठकीसाठी आगमन होताच त्यांचे जेसीबीतून पुष्पवृष्टी करत कार्यकर्त्यांनी वाजतगाजत जोरदार स्वागत केले. बैठकीच्या प्रारंभी आ. आश्विनी जगताप, पुणे शहर जिल्हाध्यक्ष शंकर जगताप यांनी त्यांचे स्वागत केले. माजी खासदार अमर साबळे, सदाशिव खाडे, महेश कुलकर्णी, माजी महापौर माईताई ढोरे, नामदेव डाके, ॲड. मोरेश्वर शेडगे आदी पदाधिकारी तसेच सुमारे दोनशे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटन आणि विविध कार्यक्रमांविषयी कार्यकर्त्यांना त्यांनी बैठकीत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. येणारी निवडणूक आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. सरकारने 'लाडकी बहिण' व इतर महत्वाचे घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचवावेत असे आवाहन त्यांनी केले.  कार्यकर्त्यांनी देखील याप्रसंगी त्यांच्या भावना व्यक्त करून उत्स्फूर्त प्रतिसादात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान,उद्या 4 तारखेला आ. पंकजाताई वडगाव शेरी व शिरूरचा आढावा घेणार आहेत. 


मोरया गोसावी गणपतीचे घेतले दर्शन

चिंचवड येथे आज गाणपत्य सांप्रदायातील महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी चिंतामणी गणरायाची विधिवत पूजाअर्चा त्यांनी केली तसेच आपल्या पुरातन संस्कृतीची साक्ष देणाऱ्या मंगलमूर्ती वाड्याला भेट दिली, याप्रसंगी चिंचवड देवस्थानच्या वतीने सन्मान स्विकारून त्यांच्याशी संवाद साधला.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या