जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या मुली उपविजेत्या

 जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या मुली  उपविजेत्या 




परळी, प्रतिनिधी...         

    दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बास्केट GVबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक म्हणजेच उपविजेता ठरला आहे. दिनांक 25/सप्टेंबर 2024 रोजी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे जिल्हा स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  या स्पर्धेत बीड जिल्ह्यातुन 35 शाळांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत  14,17,19 वयोगटातील मुले आणि मुलींनी सहभागी झाले होते.   यात सिंदफना पब्लिक स्कूल माजलगाव ने सहभाग नोंदवून जिल्हात अंडर -14 या मुलींच्या ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तर दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या  शिक्षिका कु .संघमित्रा हुमने मॅडम यांच्या टीम ने उपविजेता क्रमांक पटकावला आहे.  या स्पर्धेसाठी जमीर सय्यद इंटरनॅशनल कोच आणि बीड जिल्हा बास्केटबॉल सेक्रेटरी बीड , क्रिडा शिक्षक संजय देशमुख सर यांनी काम पाहिले.

    सर्व विजेत्यांचे  किरण गित्ते साहेब ,सचिव त्रिपुरा सरकार व विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते, मुख्याध्यापक श्रीकांत पाटील सर यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार