उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठकीत दिले ब्राह्मण समाजाला आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी
दिलासादायक:अमृत योजना कायम ठेवून ब्राह्मण समाजासाठी लवकरच भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ होणार !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठकीत दिले ब्राह्मण समाजाला आश्वासन - बाजीराव भैय्या धर्माधिकारी
मुंबई प्रतिनिधी....
गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी विविध स्तरातून सरकार दरबारी पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे. राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या संदर्भाने ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाची विशेष बैठक घेऊन चर्चा केली. अमृत योजना कायम ठेवून येत्या कॅबिनेटमध्ये आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिलीआहे. गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची लवकरच सोडवणूक होणार असून या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आज ब्राह्मण समाज शिष्टमंडळाशी विशेष बैठक घेऊन चर्चा केली. परळी येथे झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेतील मुख्य ठराव म्हणून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी एकजुटीने मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्यात समाज बांधवांच्या वतीने विविध स्तरावर आंदोलने, निवेदने व आपापल्या स्तरावरून शासन दरबारी पाठपुरावा केला गेला. परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐक्य परिषदेत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारच्या वतीने सकल ब्राह्मण समाजाला याबाबत समन्वयक म्हणून आपण भूमिका पार पाडू असा शब्द दिला होता. त्या अनुषंगाने सरकार दरबारी याबाबतचा पाठपुरावा सुरू होता. ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सातत्याने सरकार दरबारी याबाबत पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी समाज बांधव उपोषणाला बसले होते. त्यावेळीही वेळोवेळीही ना.धनंजय मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेत ब्राह्मण समाजाला आश्वासित केले होते. तीच भूमिका पार पाडत सरकारच्या स्तरावर हा प्रश्न सोडवण्यासाठीही धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून ब्राह्मण समाज शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ची बैठक ठरवण्यात आली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण समाज शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा केली. अमृत योजना कायम ठेवून लवकरात लवकर भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या शिष्टमंडळात ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संस्थापक बाजीराव भैया धर्माधिकारी,परळी वैजनाथ, विश्वजीत देशपांडे,पुणे,मनोज जोशी, लातूर, शैलेश कुलकर्णी, अंबेजोगाई, अजिंक्य पांडव, बीड , सचिन वाडे पाटील, संभाजीनगर,महेश दोरवट पाटील, संभाजीनगर,काकासाहेब कुलकर्णी, सोलापूर, संजय कुलकर्णी-सुपेकर, गंगाखेड,रमण उपाध्याय, जालना,डॉ. संजीवनी पांडे, मुंबई, विजया कुलकर्णी, संभाजीनगर सूर्यकांत देशमुख, बार्शी, शशांक खेर, डोंबिवली, आलोक चौधरी- सेलू, सौ. धनश्रीताई उत्पात, पंढरपूर आदीसह ब्राह्मण समाजातील प्रमुख समन्वयक पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा