दुःखद वार्ता:न.प.सेवानिवृत्त कर्मचारी संपत शिंदे यांचे निधन
नितीन शिंदे यांना पितृशोक: न.प.सेवानिवृत्त कर्मचारी संपत शिंदे यांचे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..
परळी नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी संपत शिंदे यांचे वृद्धापकाळाने अल्पशा आजारात निधन झाले. मृत्यू समयी ते 76 वर्षे वयाचे होते. युवक नेते नितीन शिंदे यांचे ते वडील होत.
परळी शहरातील सर्व परिचित व्यक्तिमत्त्व म्हणून संपत गणपतराव शिंदे यांची ओळख होती. मध्यरात्री अडीच वाजता अल्पशा आजारातून त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. युवक नेते नितीन शिंदे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने शिंदे कुटुंबावर कोसळलेल्या दुखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
आज दुपारी अंत्यसंस्कार
दरम्यान, दिवंगत संपत शिंदे यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज दिनांक 28 रोजी दुपारी तीन वाजता त्यांचे राहते घर नेहरु चौक (तळ) येथून अंत्ययात्रा निघणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा