शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार
परळी वैजनाथ:सरस्वती नदीच्या पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना तातडीने मदत द्यावी अशा प्रकारची मागणी सर्व स्तरातूनच होत होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही तातडीने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन दिलासा दिला होता. त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या भागात फिरून तातडीने मदतीची मागणी केली होती. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या पूरग्रस्त नागरिकांना नाथ प्रतिष्ठानकडून 10 व शासकीय मदत पाच हजार अशी पंधरा हजार रुपयाची मदत जाहीर केली. याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करून नाथ प्रतिष्ठानचेही कौतुक केले आहे.
परळी शहरातील सरस्वती पाणी वस्त्यातील घरामध्ये शिरल्याने प्रचंड नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते .कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी तर केली पण अजून ही तातडीची मदत केली नसल्याचे सांगुन गणेश उत्सवाच्या काळात तात्काळ मदत करायला हवी. पूरग्रस्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसल्यास बाप्पा आपल्याला अधिक प्रसन्नतेने आशीर्वाद देतील असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी पूरग्रस्त भागात भेटी दरम्यान वक्तव्य केले होते.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या या आवाहनाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद पूरग्रस्त बाधित लोकांना नाथ प्रतिष्ठाणकडून प्रत्येकी दहा हजार व शासकिय तातडीची पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.पूर बाधितांना ही मदत उपलब्ध झाल्यामुळे यासाठी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा