खरेदीचे अधिकार मार्केट कमिटीला देण्याची केली मागणी
बीड जिल्हयात सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत - आ. पंकजाताई मुंडे
खरेदीचे अधिकार मार्केट कमिटीला देण्याची केली मागणी
बीड।दिनांक २३।
शासनाने जिल्हयात आधारभूत किंमत दराने सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि खरेदीचे अधिकार मार्केट कमिटीला द्यावेत अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केली राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्हयात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, शेतकरी याकडे नगदी पीक म्हणून पाहतात. सध्या जिल्हयात पावसाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सोयाबीन पीक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतमाल हंगाम २०२४-२५ साठी जिल्हयात सर्वच ठिकाणी आधारभूत किंमत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक झाले आहे, खरेदी केंद्र सुरू करतानाच त्याचे खरेदीचे अधिकार मार्केट कमिटिला देण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलून तमाम शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ. पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा