केवळ इमारती बांधल्या नाहीत तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले

 लोकनेते मुंडे साहेबांनी जनतेसाठी पाहिलेली प्रत्येक स्वप्न सरकारी योजना बनवल्या

केवळ इमारती बांधल्या नाहीत तर माणसाला माणूस जोडण्याचे काम आम्ही केले


अहिल्यानगरच्या राहता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे आ. पंकजा मुंडेंच्या हस्ते थाटात उदघाटन ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह अनेकांची उपस्थिती


शिर्डी ।दिनांक ०६। 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जनतेसाठी जी  स्वप्न पाहिली होती, त्या स्वप्नांच्या मी मंत्री असताना सरकारी योजना तयार केल्या आणि त्यातून विकासाची कामे मार्गी लावली. आम्ही केवळ नवीन इमारती बांधल्या नाहीत तर शासकीय योजनांच्या माध्यमातून माणसाला माणूस जोडण्याचे काम केले, जनसेवेचे हा वसा कधीही सोडणार नाही असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी येथे केले. 


   सात कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या राहता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज आ. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. आशुतोष काळे, माजी खासदार डाॅ. सुजय विखे, शालिनीताई विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरे आदी उपस्थित होते.


   पुढे बोलताना आ. पंकजाताई म्हणाल्या, मुंडे साहेबाचा वारसा असल्याने मला समाजासाठी नेहमी चांगलच काम कराव लागत.  साहेबांनी आयुष्यभर वंचित, पिडित समाजाची सेवा केली, या घटकांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी काही स्वप्न पाहिली होती. त्यांच्या पश्चात मंत्री झाल्यावर मी त्यांची स्वप्न सरकारी योजना बनून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रत्येक भागात ग्रामपंचायत कार्यालय, वाडी, वस्ती तांड्यावर मुलभूत सोयी अशी कितीतरी करोडो रूपयांची कामे केली. राज्यात ९८ पंचायत समित्यांना ४२९ कोटी खर्च करून नवीन इमारती दिल्या. महिलांसाठी साडे तीन लाख बचतगट तयार केले. 

राहाता पंचायत समितीसाठी देखील तेंव्हा प्रशासकीय इमारत मंजूर करण्यात आली होती. आज या इमारतीने मूर्त स्वरूप धारण केले आहे. तालुक्यातील शेतकरी, सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या प्रशस्त आणि सर्व सुविधायुक्त इमारतीचे आज माझ्या हस्ते लोकार्पण करण्यात आले याचा मला आनंद होत आहे. पदावर असताना केवळ इमारती न बांधता माणसं जोडण्याचे काम आम्ही केले असं त्या म्हणाल्या.


साहेबांच्या पश्चात तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत

-------

आज मुंडे साहेब नाहीत पण त्यांच्या पश्चात तुम्ही माझ्यावर तितकेच प्रेम करत आहात, साहेब नसले तरी आज करोडो लोकांचे  आशीर्वाद सतत माझ्यासोबत आहेत आणि याच बळावर भविष्यात देखील वंचित, उपेक्षित घटकांची सेवा मी करत राहील असं अभिवचन आ. पंकजाताईंनी यावेळी दिलं. या कार्यक्रमात महिला बचत गट आणि विविध योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना धनादेशाचे वाटप तसेच फूड प्रोसेसिंग युनिटचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.


साईबाबांचे घेतले दर्शन

-------

सकाळी ११.१५ वा. आ. पंकजाताई मुंडे यांचे खासगी विमानाने शिर्डी विमानतळावर आगमन झाले, याठिकाणी माजी खासदार डाॅ. सुजय विखे व कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पंचायत समितीचा कार्यक्रम झाल्यानंतर आ. पंकजाताईंनी शिर्डीत जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार