भेल संस्कार केंद्रात शिक्षक दिन उत्साहात

 भेल संस्कार केंद्रात शिक्षक दिन  उत्साहात 



 (परळी.वै):

     येथील भा.शि.प्र. सं.अंबाजोगाई संचलित संस्कारक्षम पिढी घडविण्यात आणि भारतीयत्वाचे शिक्षण देऊन जबाबदार नागरिक घडविणाऱ्या भेल संस्कार केंद्रात भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त " शिक्षक दिन " अगदी हर्षोल्लसात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

        या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री.शांतीलाल जैन यांनी भूषविले.सर्वप्रथम मान्यवरांकडून सरस्वती पूजन आणि डाॅ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी श्री.राहुल सुर्यवंशी सर आणि त्यांचा संघाने सरस्वती स्तवन सादर केले. " *शिक्षक हा समाजाचा आरसा असतो*" त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवत असतो.त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र हा शिक्षक दिन साजरा केला जातो. आज शाळेतील वातावरण सकाळपासूनच अगदी भारावून गेलेले होते.इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी " *स्वयंशासन दिन* साजरा करून संपूर्ण दिवस शाळा चालविण्याचा " *याचि देही याचि डोळा* अनुभव घेतला. पुढे आपापली मनोगत व्यक्त करतांना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.खरोखरच शिक्षकांचे कार्य किती अवघड असते याचा अनुभव घेतला.याप्रसंगी मान्यवरांकडून संस्कार केंद्रातील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एक छान भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.याबरोबरच इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी बळवंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पदलालित्य साधत नृत्य सादर करून प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले.तसेच सौ.अपर्णा कुंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्तम लघूनाटिका शिक्षकांच्या दिनचर्येवर विद्यार्थ्यांनी सादर केली.तर श्री.राहुल सर यांनी सर्व श्रोत्यांना " माझा शिक्षक राजा ......." हे समूहगीत गाऊन मंत्रमुग्ध केले. यावेळी श्री.कुलदीप मुंडे सर आणि श्री.समीर सर यांनी शिक्षकांसाठी नानाविध खेळ शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात घेतले.यावेळी मान्यवरांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर अध्यक्षीय समारोप करतांना श्री.शांतीलाल जैन यांनी मानवी जीवनातील शिक्षकांचे महत्व पटवून देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

        यावेळी व्यासपीठावर श्री.शांतीलाल जैन, श्री.जीवनराव गडगूळ,श्री.अमोल डुबे,श्री.विष्णुपंत कुलकर्णी, .डॉ.सतीश रायते ,मुख्याध्यापक श्री.गिरीश ठाकूर  सर ,सर्व विभागप्रमुख,स्वयंशासन दिन निमित्त नवनिर्वाचित विद्यार्थी मुख्याध्यापक अनुक्रमे कु.सिया राठोड, कु.जफिरा सिद्धिकी आणि चि. सच्चिदानंद चाटे इ .मान्यवर उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गिरीश ठाकूर सर तर सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी समर्थपणे केले व आभार श्री.सौदागर साखरे सर यांनी मानले.हा कार्यक्रम कार्यक्रमप्रमूख सौ.पुनम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.अशी माहिती संकुलातील प्रसिद्धीप्रमुख यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार