परभणी-बीड जिल्ह्यात उद्या करणार नुकसानीची पाहणी

धनंजय मुंडेंनी परळी-अंबाजोगाई तालुक्यातील पूरग्रस्त भागात भेटी देऊन केली नुकसानीची पाहणी


शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश


परभणी-बीड जिल्ह्यात उद्या करणार नुकसानीची पाहणी


परळी वैद्यनाथ (दि. 03) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी व अंबाजोगाई तालुक्यात मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये भेटी देऊन नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाच्या सोबतीने धनंजय मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. 


प्रशासनास तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठवण्याचे निर्देश यावेळी धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. परळी तालुक्यातील कौडगाव हुडा, कौडगाव घोडा आदी गावांमध्ये भेटी दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 


दरम्यान बीड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसात सातत्याने झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून अनेक नद्यांना पूर आले आहेत. गावांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंची नासधूस-घरांची पडझड आदी नुकसानीचेही पंचनामे करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी प्रशासनास सूचना केल्या आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, राजाभाऊ पोळ यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.


दरम्यान बुधवारी सकाळी धनंजय मुंडे हे परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, बीड जिल्ह्यातील गेवराई आदी तालुक्यातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !